देवळाली प्रवरा(वेबटीम) समाजात एकता, बंधुभाव आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या 'युनिटी ऑफ ह्य...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
समाजात एकता, बंधुभाव आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या 'युनिटी ऑफ ह्युमॅनिटी (Unity Of Humanity)' क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात किंग-11 संघाने विजेतेपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. अत्यंत चुरशीच्या आणि रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात किंग-11च्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघावर मात केली.
अफसर शेख आणि वसीम तांबोळी यांच्या नेतृत्वाखालील संघाने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठली होती. अंतिम सामन्यातही खेळाडूंनी संयम, कौशल्य आणि जिद्दीच्या जोरावर विजय संपादन करून स्पर्धेची मानाची ट्रॉफी आपल्या नावावर केली.
स्पर्धेच्या भव्य सांगता समारंभात प्रमुख पाहुणे, आयोजन समितीचे पदाधिकारी आणि मान्यवरांच्या हस्ते विजेत्या किंग-11 संघाला आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात आली. यावेळी खेळाडू, समर्थक आणि क्रिकेटप्रेमींनी जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला.
'युनिटी ऑफ ह्युमॅनिटी सोशल अँड एज्युकेशनल वेलफेअर सोसायटी' आयोजित क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न.
द्वितीय क्रमांक - श्रीनाथ इलेव्हन,तृतीय क्रमांक - महाराणा इलेव्हन आणि चतुर्थ क्रमांक - विराज इलेव्हन यांनी मिळविला.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष अफसर शेख, मौलाना मुजम्मिल, मौलाना शहबाज, अनिस शेख,सतीश डोळस, जाहिद अतार,अर्शद शेख, आरिफ शेख, समीर सय्यद, शहबाज शेख, अरबाज मेमन, रशीद बागवान ,सलीम शेख यांनी परिश्रम घेतले तर सोमा कोळसे, सतीश डोळस, गोकुळ बर्डे आणि आरिफ शेख यांचे सहकार्य लाभले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत