राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता; राहुरी फॅक्टरीच्या समृद्धी पवळेची उल्लेखनीय कामगिरी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता; राहुरी फॅक्टरीच्या समृद्धी पवळेची उल्लेखनीय कामगिरी

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-   आंध्र प्रदेश येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील मुलींच्या सं...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-


 आंध्र प्रदेश येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. या संघामध्ये राहुरी फॅक्टरी येथील कु. समृद्धी महेश पवळे हिचा मोलाचा सहभाग राहिला.

कु. समृद्धी पवळे ही राहुरी फॅक्टरी येथील ज्येष्ठ नागरिक चांगदेव पवळे यांची नात असून ती डी पॉल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठित स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना समृद्धीने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

समृद्धीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत