देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक १ मधील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांच्या विकासकामांना गती देण्यासाठी ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक १ मधील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांच्या विकासकामांना गती देण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्यांचे मॅपिंग करण्यात आले.
देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी नगरपरिषद हद्दीतील सर्व प्रभागांतील रस्त्यांची विकासकामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्याची भूमिका घेतली असून, त्याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक १ मधील विविध भागांची पाहणी करण्यात आली.
यामध्ये वीटभट्टी परिसर, बाबुराव कॉलनी, भंडारी कॉलनी, दत्तनगर, अंबिकानगर, कोल्हार व दवणगाव परिसर, आंबिस्टोअर रस्ता, दत्तनगर, शिक्षण कॉलनी, चव्हाण, इनामदार, साळुंके-सातभाई, ठोंबरे, तारडे-तावरे वस्ती भागातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक मोजमाप व मॅपिंग करण्यात आले. या कामांमुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित रस्त्यांची सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी नगरसेवक अजित चव्हाण, नगरसेविका आशाताई चव्हाण, केदारनाथ चव्हाण यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व सूचना जाणून घेतल्या. यावेळी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व परिसरातील उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत