श्रीरामपूर प्रांताधिकाऱ्यांनी स्वतः भरून घेतले नगराध्यक्षांचे गणना पत्र - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्रीरामपूर प्रांताधिकाऱ्यांनी स्वतः भरून घेतले नगराध्यक्षांचे गणना पत्र

श्रीरामपूर(वेबटीम ) राज्यभर सुरू झालेल्या विशेष सखोल मतदार पडताळणी मोहिमेला श्रीरामपूर तालुक्यात उत्स्फूर्त सुरुवात झाली. मोहिमेच्या प्रारंभ...

श्रीरामपूर(वेबटीम)



राज्यभर सुरू झालेल्या विशेष सखोल मतदार पडताळणी मोहिमेला श्रीरामपूर तालुक्यात उत्स्फूर्त सुरुवात झाली. मोहिमेच्या प्रारंभी श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे आणि देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांचे गणना पत्र प्रांताधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी किरण सावंत पाटील यांनी स्वतः त्यांच्या कार्यालयात जाऊन भरून घेतले. या प्रतीकात्मक उपक्रमातून मतदार पडताळणी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी नगराध्यक्ष करण ससाणे व सत्यजित कदम यांना विशेष सखोल मतदार पडताळणी मोहिमेची उद्दिष्टे, प्रक्रिया आणि नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच सर्व राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करून बूथ लेव्हल अधिकारी यांना सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहनही सावंत पाटील यांनी यावेळी केले.

नगराध्यक्ष करण ससाणे व सत्यजित कदम यांनीही मतदार पडताळणी ही लोकशाही बळकट करणारी महत्त्वाची प्रक्रिया असल्याचे सांगत नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह सहकार्य करावे आणि मतदार यादी अचूक करण्यासाठी प्रशासनाच्या या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

प्रशासनाच्या पुढाकारामुळे श्रीरामपूर तालुक्यात एसआयआर मोहिमेला सकारात्मक वातावरणात प्रारंभ झाल्याचे चित्र असून आगामी काळात जनजागृतीला अधिक गती देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. यावेळी स्वीप समन्वयक गणेश पिंगळे, संदिप पाळंदे, बीएलओ रमेश बोकफोडे, गौरव जेधे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत