देवळाली प्रवरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचक कट्टा उभारण्याची मागणी; नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना निवेदन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचक कट्टा उभारण्याची मागणी; नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना निवेदन

देवळाली प्रवरा(प्रतिनिधी)  युवकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अधिकाधिक प्रसार व्हावा आणि विद्यार्थ्या...

देवळाली प्रवरा(प्रतिनिधी)



 युवकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अधिकाधिक प्रसार व्हावा आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी हक्काचे सार्वजनिक व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील गट क्रमांक ३३७ येथे 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचक कट्टा' उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात परिसरातील युवकांच्या वतीने नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन सचिन कोठुळे आणि सतीश वाळुंज यांच्या माध्यमातून देण्यात आले.


राजवाडा परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या आहे. या परिसरातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे युवक तसेच सर्वसामान्य वाचकांसाठी दर्जेदार वाचन सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी सुशोभीकरणात्मक वाचक कट्टा उभारण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.


यावेळी मानवाधिकार संरक्षण समितीचे राहुरी तालुका निरीक्षक प्रकाश शिवाजी पंडित म्हणाले, "युवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेणे आणि त्यांच्या विचारांचे अध्ययन करून ते जीवनात आत्मसात करणे अधिक महत्त्वाचे आहे. बाबासाहेबांची ग्रंथसंपदा युवकांपर्यंत सहज उपलब्ध व्हावी, यासाठी वाचक कट्टा उभारण्याची संकल्पना युवकांच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. हा उपक्रम समाजात वैचारिक जागृती घडवून आणणारा ठरेल."


यावेळी भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अक्षय सुरेश संसारे यांनी सांगितले की, नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी या मागणीची सकारात्मक दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना जागेची तातडीने पाहणी करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे हा उपक्रम लवकरच प्रत्यक्षात येईल, याची खात्री आहे.नगराध्यक्षांनी दाखविलेली तत्परता ही निश्चितच स्वागतार्ह असल्याचे त्यांनी नमूद केले.


निवेदन स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी उपस्थित युवकांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. तसेच युवकांनी सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करत या मागणीबाबत तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. 

त्याचप्रमाणे यावेळी माजी उपनगराध्यक्ष आणि गटनेते  प्रकाशभाऊ संसारे यांनीही उपस्थितीत युवकांच्या कल्पनेला दाद देताना नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या माध्यमातून देवळाली प्रवरा नगरपरिषद नेहमीच युवकांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली.


यावेळी ॲड. ऋषी राजेंद्र पंडित, ॲड. विशाल फिलीप संसारे, प्रकाश शिवाजी पंडित, अक्षय सुरेश संसारे, ॲड. पांडुरंग जालिंदर मुसमाडे, अभिजित शिंदे यांच्यासह देवळाली प्रवरा नगरपरिषद स्थापत्य अभियंता दिनकर पवार ,अभिषेक सुतावणे , लेखा विभाग लिपीक  रोहित पंडित व शहर समन्वयक उदय इंगळे हे देखील उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत