देवळालीतून श्रीरामपूरकडे जाताना 'त्या' आर्त हाकेवर थांबली प्रांतधिकाऱ्यांची ‘लाल दिव्याची’ गाडी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळालीतून श्रीरामपूरकडे जाताना 'त्या' आर्त हाकेवर थांबली प्रांतधिकाऱ्यांची ‘लाल दिव्याची’ गाडी

श्रीरामपूर(वेबटीम) रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात विव्हळणारे दोन जीव, असह्य वेदनेने फुटणाऱ्या किंकाळ्या, भोवताली बघ्यांची गर्दी आणि तेवढ्यात ...

श्रीरामपूर(वेबटीम)



रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात विव्हळणारे दोन जीव, असह्य वेदनेने फुटणाऱ्या किंकाळ्या, भोवताली बघ्यांची गर्दी आणि तेवढ्यात थांबलं एक शासकीय वाहन. पदाचा रुबाब, प्रोटोकॉल सारे बाजूला ठेवून त्यातून उतरले प्रांताधिकारी किरण सावंत पाटील आणि क्षणात बनले माणुसकीचे हात. 

सविस्तर वृत्त असे की, बुधवारी (दि. ०१) देवळाली प्रवरा येथून निवडणूक काम आटोपून सहकारी स्विप समन्वयक गणेश पिंगळे, संदिप पाळंदे यांच्यासह परतताना रामगडजवळचा थरारक अपघात त्यांनी पाहिला. भरधाव दुचाकीने सायकलस्वार वृद्धाला उडवलं होतं. मोडलेला हात, रक्तबंबाळ शरीर घेऊन ते आजोबा कण्हत होते. काही अंतरावर धडक देणारा दुचाकीस्वारही जखमी पडला होता. 

एका क्षणाचाही विचार न करता सावंत पाटील धावले. ॲम्ब्युलन्सची वाट न पाहता आपले कर्मचारी अक्षय बागडे, गोसावी मामा यांच्या मदतीने दोन्ही जखमींना स्वतःच्या शासकीय वाहनातून साखर कामगार रुग्णालयात नेले. वेळेत उपचार मिळाल्याने दोघांचे प्राण वाचले. 

“आज अधिकारी नाही, देवमाणूस पाहिला, क्लास वन अधिकाऱ्यातलं हळवं काळीज श्रीरामपूरकरांनी अनुभवलं.” अशी प्रतिक्रिया देत कृतज्ञ नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी दाखवून दिलं की मोठेपण पदात नसतो तर संकटात धावून जाणाऱ्या माणुसकीत असतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत