प्रेरणा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची कर्जवसुलीची परंपरा कायम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

प्रेरणा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची कर्जवसुलीची परंपरा कायम

गुहा(वेबटीम) गुहा येथील प्रेरणा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (स्थापना सन 2002) यांनी यंदाही उत्कृष्ट कर्जवसुलीची परंपरा कायम राखत बँक ...

गुहा(वेबटीम)



गुहा येथील प्रेरणा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (स्थापना सन 2002) यांनी यंदाही उत्कृष्ट कर्जवसुलीची परंपरा कायम राखत बँक पातळीवर 100 टक्के, तर सोसायटी पातळीवर 96 टक्के कर्जवसुलीचा टप्पा गाठला आहे. ही माहिती संस्थेचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी दिली.

संस्थेकडे 30 जून अखेर वसुलीस पात्र असलेली कर्जाची एकूण रक्कम 2 कोटी 15 लाख 27 हजार 885 रुपये होती. त्यापैकी 2 कोटी 6 लाख 88 हजार 510 रुपयांची कर्जवसुली करण्यात आली. त्यामुळे सोसायटी पातळीवर 96 टक्के कर्जवसुली पूर्ण झाली असून बँक पातळीवर शंभर टक्के वसुलीची नोंद झाली आहे.

संस्थेचे एकूण 119 कर्जदार असून, सचिव दिपक सौदागर यांनी कर्जवसुलीचे कामकाज प्रभावीपणे पार पाडले. या यशामागे सर्व कर्जदारांचे सहकार्य महत्त्वाचे ठरल्याचे सांगत संस्थेचे उपाध्यक्ष अशोक उर्ह व संचालक मंडळाने सर्व कर्जदारांचे आभार मानले. दरवर्षी समाधानकारक कर्जवसुलीची परंपरा कायम राखणाऱ्या संस्थेने यंदाही आर्थिक शिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत