देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील करजगाव शिव रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याची दखल घेत नगराध्यक्ष सत्यजित कदम यां...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील करजगाव शिव रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याची दखल घेत नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्यावर मुरूम टाकण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार रस्त्यावर मुरूम टाकण्यात आल्याने या मार्गावरून ये-जा करणारे विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, प्रभाग क्रमांक २ मधील मुख्य व अंतर्गत रस्त्यांच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत लाख रोड, ३चारी वाकाण रोड, जुना बेलापूर रोड, दवणगाव रोड आणि मुसमाडे वस्ती रोड या रस्त्यांचे मॅपिंग पूर्ण करण्यात आले आहे. या मॅपिंगच्या आधारे संबंधित रस्त्यांच्या विकासकामांना गती मिळणार असून येत्या काळात या रस्त्यांवरील विविध समस्या मार्गी लागणार असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी नगरसेविका मनिषा कदम, डॉ. अजिंक्य कदम तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत