देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील रक्तमित्र प्रशांत काकासाहेब कदम यांच्या मोफत ब्लड सेवा व मोफत रुग्णसेवा या स...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील रक्तमित्र प्रशांत काकासाहेब कदम यांच्या मोफत ब्लड सेवा व मोफत रुग्णसेवा या समाजसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव सन्मान २०२६ सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन नुकतेच गौरव करण्यात आला.
हा मानाचा सन्मान अरिहंतानम रक्त सारथी संस्थाचे कैलाश जैन व त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने प्रदान करण्यात आला यावेळी भारतीय सैन्य दलाचा अभिमान राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कॅप्टन डॉक्टर सुरेश सैनी (कर्नाल, हरियाणा) अजित वहाडणे, मंतोष मिश्रा, रक्तवीर मनोज जैन, सोनिया दीदी (दिल्ली) काजल सिक्काजी, अभय दादा, तसेच देशभरातून आलेले अनेक मान्यवर आणि रक्तदान क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सण २०१० पासून रक्तदान चळवळीत कार्यरत असलेल्या प्रशांत काकासाहेब कदम यांनी आतापर्यंत १६ वेळा व २४ वेळा प्लाजमा डोनेशन करून अनेक गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने निस्वार्थ सेवा केलेली आहे. त्यांच्या या समाज हिताच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेऊन त्यांना श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव सन्मान 2026 पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने देवळाली प्रवरा गावासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत