राहुरी फॅक्टरी(वेबटीम) येथील मुजफ्फर कय्युम शेख यांच्या ‘एमजे मोबाईल रिपेरिंग अँड ॲक्सेसरीज’ या नवीन दालनाचा उद्घाटन समारंभ नगराध्यक्ष सत्यज...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
येथील मुजफ्फर कय्युम शेख यांच्या ‘एमजे मोबाईल रिपेरिंग अँड ॲक्सेसरीज’ या नवीन दालनाचा उद्घाटन समारंभ नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष सत्यजित कदम म्हणाले की, “स्थानिक युवकांनी उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. स्थानिक स्तरावर सुरू होणारा प्रत्येक नवीन उद्योग हा केवळ एका कुटुंबाच्या प्रगतीचा टप्पा नसून, तो संपूर्ण परिसराच्या आर्थिक विकासाला चालना देणारा आणि रोजगारनिर्मितीला बळ देणारा महत्त्वाचा आधार असतो. स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”
नगराध्यक्ष कदम यांनी मुजफ्फर कय्युम शेख यांना नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा देत त्यांच्या उपक्रमास भरघोस यश लाभावे तसेच हा व्यवसाय परिसरातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरावा, अशी सदिच्छा व्यक्त केली.
यावेळी नगरसेवक तथा गटनेते प्रकाश संसारे, नगरसेवक ऋषभ लोढा, माजी नगरसेवक प्रदीप गरड, संतोष झावरे, पिनू झावरे, सुहास महाजन, संभाजी शिंदे, डॉ. सुनील कदम, किरण गायके, बबलू घाडगे तसेच राजे छत्रपती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, हितचिंतक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत