राहुरीतील प्रगती विद्यालयात उमेद सोशल फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीतील प्रगती विद्यालयात उमेद सोशल फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम संपन्न

राहुरी/वेबटीम:- उमेद सोशल फाउंडेशन, अहिल्यानगर यांच्या वतीने प्रगती विद्यालय, राहुरी येथे वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिर व शैक्षणिक साहित्य...

राहुरी/वेबटीम:-

उमेद सोशल फाउंडेशन, अहिल्यानगर यांच्या वतीने प्रगती विद्यालय, राहुरी येथे वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिर व शैक्षणिक साहित्य वितरणाचा सामाजिक उपक्रम पार पडला.



श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांच्या प्रेरणेने व जनरल सेक्रेटरी हर्ष तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पा. कोळसे प्रमुख पाहुणे, जनार्दन (गणेश) पाटील गाडे अध्यक्षस्थानी, तर राहुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.


मुख्याध्यापक बी. जे. जाधव यांनी प्रास्ताविकातून विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेत उमेद सोशल फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या तसेच रवि साखरे यांच्या कन्या स्वामिनीच्या वाढदिवसानिमित्त कंपास किटचे वितरण करण्यात आले. डॉ. बारगळ यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन केले, तर "जल है तो कल है" या संदेशातून वृक्षारोपण करण्यात आले.


विद्यालयाच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही ज्ञानेश्वर पा. कोळसे व जनार्दन (गणेश) पाटील गाडे यांनी दिली. उमेदचे उपाध्यक्ष कुणाल तनपुरे यांनी सामाजिक कार्याचा आढावा घेत कवितेद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.


कार्यक्रमास उमेद सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे, उपाध्यक्ष कुणाल तनपुरे, खजिनदार संजय निर्मळ, सल्लागार रणजीत लहारे, जनसंपर्क अधिकारी बाळू सगळगिळे, पत्रकार विजय लोंढे, रवी साखरे, रवी सुरेकर, सी-२४ तासचे अनिल जाधव, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. जे. जाधव, जगताप सर,आर.ए. जाधव,कोळसे सर, देशमुख सर, मुसळे मॅडम, देवरे मॅडम, राठोड मॅडम, काटे मॅडम, सातभाई मॅडम, भाऊसाहेब पगारे, हरीश गाडे व गणेश इंगळे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन जगताप सर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत