देवळाली प्रवरा(वेबटीम) येथील श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज देवस्थानच्या श्रीक्षेत्र श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्याचे रव...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
येथील श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज देवस्थानच्या श्रीक्षेत्र श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्याचे रविवार दि. १२ जुलै रोजी देवळाली प्रवरा येथून प्रस्थान होणार असल्याची माहिती समर्थ बाबुराव पाटील महाराज पायी दिंडी व्यवस्थापन समितीच्यावतीने देण्यात आली.
दिंडीचे प्रस्थान होत असून रविवार १२ जुलै रोजी २९ जुलै पर्यंत चालणाऱ्या या दिंडी सोहळ्याचे हे १५ वे वर्ष आहे. दिंडीचा पहिला मुक्काम कोंढवड येथे असेल. १३ जुलै रोजी वांबोरी येथील राजपुष्प मंगलकार्यालय, १४ रोजी बुऱ्हाणनगर, १५ रोजी शिराढोण, १६ रोजी बनपिंप्री, १७ रोजी मिरजगाव, १८ रोजी निमगावडाकू, १९ रोजी करमाळा, २०
रोजी आदिनाथ माध्यमिक विद्यालय अदिनाथ साखर कारखाना, २१ रोजी साईराज मंगलकार्यालय टेंभुर्णी, २२ रोजी परिते, २३ रोजी विठ्ठल सहकारी साखर कारखाना गुरसाळे, २४ रोजी दिंडी विधी महाविद्यालय जुना कराड नाका पंढरपूर येथे मुक्कामी असेल. २५ रोजी ही दिंडीचा येथेच मुक्काम असेल. २६ जुलै रोजी काल्याचे कीर्तन
होऊन दिंडीतील भाविक परतीच्या मार्गाला लागतील. बुधवार २९ जुलै रोजी सकाळी १० वाजता देवळाली प्रवरा येथील समर्थ बाबुराव पाटील मंदिर बाजारतळ येथे काल्याचे कीर्तन होईल व त्यानंतर सुनील चंदनशिवे यांच्यावतीने महाप्रसाद होऊन यावर्षीच्या दिंडी सोहळ्याचा समारोप होईल.
दिंडीतील प्रवेश विनामूल्य असून दिंडीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी दिंडी व्यवस्थापन समिती सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन दत्तात्रय बाबुराव कडू पाटील, भाऊसाहेब गंगाधर गडाख
अजिंक्य कडुपाटील, शिवराम कडु, देवराम कडु, एकनाथ पठारे, शिवाजी बोंबले, पांडुरंग शेटे, राजेंद्र पंडीत विठ्ठल कडु, दत्तात्रेय खांदे विजय कुमावत, सोपान कडु यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत