देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा बाजारतळ येथे नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी आणखी एक सुविधा उपलब्ध झाली असून, 'साईन...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा बाजारतळ येथे नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी आणखी एक सुविधा उपलब्ध झाली असून, 'साईनाथ मेडिकल अँड जनरल स्टोअर्स' या नव्या दालनाचा शुभारंभ रविवारी माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. परिसरातील नागरिक, व्यापारी, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर आणि विविध सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नव्या दालनाच्या संचालकांना शुभेच्छा देत, दर्जेदार औषधे, आरोग्यविषयक साहित्य आणि ग्राहकांना विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त केली. देवळाली प्रवरा आणि परिसरातील नागरिकांना आवश्यक औषधे व दैनंदिन वापरातील आरोग्यविषयक साहित्य एकाच ठिकाणी सहज उपलब्ध होणार असल्याने या नव्या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले.
या उद्घाटन प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम, वीर भाऊसाहेब महाराज, नामदेव महाराज शास्त्री, ज्येष्ठ नेते सिताराम ढुस, नगरसेवक प्रकाश संसारे, अमोल कदम, सचिन ढुस, सोसायटीचे चेअरमन मंजबापू वरखडे, शहाजी कदम, शैलेंद्र कदम, अनंत कदम, डॉ. संदीप मुसमाडे, संजय बर्डे, रवी ढुस, अशोक कदम, किशोर कदम, मच्छीं द्र कराळे, जयेश मुसमाडे, राजेंद्र चव्हाण, शांताराम घायतडकर, अक्षय घायतडकर, प्रा. भोसले, डॉ. नेहे, डॉ. शिंदे, डॉ. वीर, डॉ. लोखंडे, डॉ. ठोंबरे, डॉ. कोठुळे, डॉ. सय्यद यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्य पद्धतीने करण्यात आले होते. उपस्थितांचे स्वागत, सत्कार आणि कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सावळेराम चांगदेव कदम (आबा), संतोष चांगदेव कदम, वैभव संतोष कदम, शुभम सावळेराम कदम तसेच समस्त कदम परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी नव्या दालनास भरभराटीच्या शुभेच्छा देत या उपक्रमाला भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत