देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा सायकलिंग व ट्रेकिंग ग्रुपच्या वतीने दि. १० जुलै ते १२ जुलै दरम्यान पंढरपूर सायकल वारीचे आयोजन करण्यात...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
देवळाली प्रवरा सायकलिंग व ट्रेकिंग ग्रुपच्या वतीने दि. १० जुलै ते १२ जुलै दरम्यान पंढरपूर सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धन, आरोग्यदायी जीवनशैली आणि सुरक्षित सायकलिंगचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात एकूण २५ सायकलपटू सहभागी होणार आहेत. १० जुलै रोजी पहाटे देवळाली डेपो येथून प्रस्थान ठेवणाऱ्या या सायकल वारीचे यंदाचे ५ वे वर्ष आहे.
या सायकल वारीत देवळाली प्रवरा शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांचा विशेष सहभाग असणार आहे. तसेच देवळाली प्रवरा सायकलिंग व ट्रेकिंग ग्रुपचे अध्यक्ष संभाजी वाळके आणि उपाध्यक्ष राहुल दुधाडे यांच्या नेतृत्वाखाली ही सायकल वारी पार पडणार आहे.
आषाढी भक्तीभावाची परंपरा आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश यांचा संगम साधत ही सायकल वारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. सायकलपटू प्रवासादरम्यान प्लास्टिकमुक्ती, वृक्षसंवर्धन, प्रदूषण नियंत्रण आणि नियमित व्यायामाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविणार आहेत.ही सायकलवारी देवळाली प्रवरा, राहुरी, अहिल्यानगर, मिरजगाव, करमाळा, टेंभुर्णी, मार्गे पंढरपूर येथे पोहोचणार आहे.
या आव्हानात्मक प्रवासासाठी सहभागी सायकलपटूंनी विशेष सराव व शारीरिक तयारी केली असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेटचा वापर, वाहतूक नियमांचे पालन आणि आवश्यक काळजी घेण्यात येणार आहे.या ग्रुपच्या वतीने २०२४ साली पंढरपूर सायकलवारीच्या निमित्ताने रस्त्याने जाताना च्या माध्यमातून वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धन संदेश देण्यात आला.यंदाही परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे.
या सायकल वारीसाठी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम पा., नगरसेवक प्रकाश संसारे, सतिष वाळुंज, ऋषभ लोढा, साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, अहिल्यानगर येथील बाईक टेक पॉईंटचे संभाजी मोहिते यांचे सहकार्य लाभणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत