माजी विद्यार्थ्यांकडून श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य भेट - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

माजी विद्यार्थ्यांकडून श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य भेट

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) डॉक्टर दिनाचे औचित्य साधत श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, श्रीशिवाजीनगर येथील सन २०००-०१ च्या दहावीच्...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



डॉक्टर दिनाचे औचित्य साधत श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, श्रीशिवाजीनगर येथील सन २०००-०१ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी प्रेरणादायी उपक्रम राबविला. "एक हात मदतीचा – विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा" या संकल्पनेतून व्हॉट्सॲपवर 'चैतन्य ग्रुप' स्थापन करून माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले.


आजच्या स्पर्धात्मक युगात मराठी शाळांचे अस्तित्व टिकावे, त्यांचा भौतिक व शैक्षणिक विकास व्हावा, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि सुशिक्षित, सुसंस्कृत पिढी घडावी, या उद्देशाने माजी विद्यार्थी एकत्र आले आहेत.


मुख्याध्यापक बी. एल. शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा इयत्ता पाचवीसाठी १०५ तसेच इतर वर्गांसाठी ४० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. शाळेतील दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा, सुसज्ज इमारत, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, क्रीडांगण, विविध खेळ, एनसीसी युनिट, स्पर्धा परीक्षांतील यश, प्रभावी अध्यापन आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे कारखाना परिसरासह चिंचविहिरे, गणेगाव व आसपासच्या भागातून प्रवेशासाठी पालकांचा ओढा वाढला आहे.


विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती वाढावी आणि शिक्षणाचा प्रवाह तळागाळापर्यंत पोहोचावा या उद्देशाने चैतन्य ग्रुपच्या वतीने माजी विद्यार्थी अतुल बंगाळ (एसबीआय अधिकारी, राहुरी), डॉ. महेश लाटे (निरामय हॉस्पिटल, राहुरी) आणि डॉ. देवेंद्र निकम यांनी त्यांचे वडील स्वर्गीय भास्करराव सुखदेव निकम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य भेट दिले.


या उपक्रमाचे मंडळाचे अध्यक्ष अरुण तनपुरे, भारत वारुळे, ज्ञानेश्वर कोळसे, जनरल सेक्रेटरी हर्ष तनपुरे, सुनील मोरे,  रावसाहेब तनपुरे, शालेय समितीचे विश्वस्त व कारखाना संचालक कृष्णा मुसमाडे, लक्ष्मीनारायण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अरुण ढूस तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.


या उपक्रमाची संकल्पना मांडून त्याचा पाठपुरावा माजी विद्यार्थी व शिक्षक अमित देशमुख यांनी केला, तर या सामाजिक कार्याची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम श्रीकांत निकम यांनी केले.


मुख्याध्यापक बी. एल. शिरसाठ, पर्यवेक्षक चव्हाण सर यांनी चैतन्य ग्रुप, अतुल बंगाळ, डॉ. महेश लाटे, डॉ. देवेंद्र निकम, अमित देशमुख, वसंत वरखडे, श्रीकांत निकम तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत