देवळाली प्रवरा(वेबटीम) इस्लाम धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या हज यात्रेसाठी देवळाली येथील सेवानिवृत्त तलाठी आयुब...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
इस्लाम धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या हज यात्रेसाठी देवळाली येथील सेवानिवृत्त तलाठी आयुब शेख हे सुपुत्र आशिफ शेख व कुटुंबियांसमवेत रवाना झाले. त्यांच्या या पवित्र यात्रेनिमित्त देवळाली येथील डीएमसी उद्योग समूहाच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत यात्रा सुखरूप, मंगलमय आणि यशस्वीरीत्या पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली.डीएमसी उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा नगरसेवक अजित चव्हाण यांच्या हस्ते आयुब शेख यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना अजित चव्हाण यांनी हज यात्रा ही श्रद्धा, संयम, त्याग आणि मानवतेचा संदेश देणारी पवित्र यात्रा असल्याचे सांगितले. आयुब शेख व त्यांच्या कुटुंबीयांची ही यात्रा सुखरूप पार पडावी तसेच त्यांना उत्तम आरोग्य, आनंद आणि आध्यात्मिक समाधान लाभावे, अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या.
आयुब शेख यांनीही डीएमसी उद्योग समूहाने केलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. समाजातील विविध घटकांनी दिलेल्या प्रेम, सदिच्छा आणि आशीर्वादामुळे हज यात्रेचा आनंद अधिक वाढल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या प्रसंगी सागर भालेकर, युनूसभाई शेख, बाबासाहेब जाधव, राजेंद्र चव्हाण, श्रीराम चव्हाण, बापू भालसिंगे, बाबूभाई शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी आयुब शेख व त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा देत त्यांच्या पवित्र यात्रेसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. सत्कार समारंभ आनंदी आणि धार्मिक वातावरणात पार पडला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत