नेवासा (तालुका प्रतिनिधी) नेवासे येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पायी पालखी दिंडी बुधवार (८ जुलै) मोठ्या उत्साहात विठुरायाच्या गजरात...
नेवासा (तालुका प्रतिनिधी)
नेवासे येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पायी पालखी दिंडी बुधवार (८ जुलै) मोठ्या उत्साहात विठुरायाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान केले. नेवासे शहरात माऊलींच्या राजाचं आगमन होताच सडा रांगोळी तोफांची सलामी, फटाक्यांची आतषबाजी जेसीबी मधून पुष्प वृष्टी करण्यात आली. पहिले रिंगण नेवासा एस.टी डेपोच्या आगारात पार पडले.यंदा प्रथमच या दिंडी सोहळ्यासाठी राज्य शासनाकडून वारकऱ्यांच्या सुरक्षितता आणि सोयी-सुविधांसाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे. देहू-आळंदी पालखी सोहळ्याप्रमाणेच विविध शासकीय सुविधा या दिंडीला उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने वारकरी संप्रदायात समाधानाचे वातावरण आहे. संत ज्ञानेश्वर मंदिराचे प्रमुख वेदांताचार्य महंत देवीदास महाराज म्हस्के,राऊत महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा पंढरपूरकडे रवाना झाला.आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, युवा नेते उदयन गडाख पाटील,शिवसेना नेते प्रभाकर शिंदे, सौ.रत्नमाला लंघे ,नेवासा नगरपंचायत अध्यक्ष डॉ. करण घुले, उपाध्यक्ष शालिनी सुखधान, माऊली पेचे, बाळासाहेब शिंदे,दिलीपराव पवार , बाळासाहेब पवार प्रतापराव चिंधे,
संत ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग , विश्वस्त कैलास जाधव, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान जनसंपर्क अधिकारी आशिश चावरे, सुनिल मोरे,खासदार भाऊसाहेब वाकचौरे नेवासा जनसंपर्क प्रमुख धनंजय पाटील, नेवासा तहसीलदार डॉ संजय बिरादार, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,सपोनि अमोल पवार पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, गटविकास अधिकारी संजय लखवाल आदीं सह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.हा दिंडी सोहळा सुरक्षित, शिस्तबद्ध आणि भाविकांसाठी सर्व सोयी-सुविध उपलब्ध असून तंतोतंत पालन होणार आहे.
माऊलींच्या पादुका घेवून जाणारी रथाची बैलजोडी संत ज्ञानेश्वर देवस्थान विश्वस्त कैलास आप्पासाहेब जाधव यांची बैलजोडी आकर्षक ठरत आहे. सजावट बघून डोळ्यांचे पारणे फिटत आहे.
प्रशासनाच्यावतीने सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असून नेत्रदीपक सोहळा पार पडणार असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, यांचा मागदर्शनाखाली जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, जिल्हा पोलिस अधीक्षक एम सुदर्शन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैभव कुलबर्मै पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी नियोजन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत