वांबोरीतील युरिया खत गैरप्रकारांवर शेतकऱ्यांचा संताप; कृषी विभागाकडे निवेदन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वांबोरीतील युरिया खत गैरप्रकारांवर शेतकऱ्यांचा संताप; कृषी विभागाकडे निवेदन

वांबोरी (ता. राहुरी)  वांबोरीतील काही कृषी सेवा केंद्रांकडून युरिया खताचा साठा उपलब्ध असूनही सर्वसामान्य शेतकऱ्यांना खत दिले जात नसल्याचा आर...

वांबोरी (ता. राहुरी) 



वांबोरीतील काही कृषी सेवा केंद्रांकडून युरिया खताचा साठा उपलब्ध असूनही सर्वसामान्य शेतकऱ्यांना खत दिले जात नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली.


निवेदनात युरिया खतासोबत इतर खते किंवा कृषी साहित्य घेण्याची सक्ती (लिंकिंग), शेतकऱ्यांशी अरेरावीची भाषा व शिवीगाळ, तसेच PoS यंत्रणा बंद असल्याचे कारण सांगून खत वितरणात अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर युरिया खत उपलब्ध ठेवावे, खतसाठ्याची माहिती दर्शविणारा फलक लावावा व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.


यावेळी वांबोरी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये गोटीराम मोरे, विष्णू ढवळे, बापूसाहेब मोरे, गोधराम पागिरे, अविनाश घावटे,दादासाहेब मोरे, सचिन गडाख, आंषाबापू गडाख, अमोल गडाख, रवी पटारे, अशोक पटारे, मनोज देशमाने कृष्णा पागिरे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत