देवळाली प्रवरा (प्रतिनिधी) ओम चॅरिटेबल ट्रस्ट, चेन्नई (तामिळनाडू) यांच्या वतीने आयोजित नॅशनल वैदिक विस्टा २०२६ अंतर्गत झालेल्या शुक्ल यजुर्व...
देवळाली प्रवरा (प्रतिनिधी)
ओम चॅरिटेबल ट्रस्ट, चेन्नई (तामिळनाडू) यांच्या वतीने आयोजित नॅशनल वैदिक विस्टा २०२६ अंतर्गत झालेल्या शुक्ल यजुर्वेद संहिता परीक्षेत देवळाली येथील चि. आदित्य गणेश कुलकर्णी याने ९० टक्के गुण मिळवत प्रथम श्रेणी संपादन केली आहे.
देशभरातील अनेक विद्यार्थ्यांनी या प्रतिष्ठित परीक्षेत सहभाग घेतला होता. अत्यंत स्पर्धात्मक वातावरणात आदित्यने मिळवलेले हे यश देवळाली परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
या यशासाठी त्याला नृसिंहवाडी (जि. कोल्हापूर) येथील स्वामी स्वरूपानंद वेद विद्यालयाचे वेदमूर्ती गोविंद जोशी आणि वेदमूर्ती अथर्व जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
आदित्यच्या या उल्लेखनीय यशाबद्दल ओम चॅरिटेबल ट्रस्ट, चेन्नईचे पदाधिकारी, नातेवाईक, ग्रामस्थ तसेच विविध स्तरांतील मान्यवरांकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील शैक्षणिक व वैदिक वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आदित्य हा वेदसंपन्न विजय जोशी गुरू यांचा नातू तर दिनेश जोशी यांचा भाचा आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत