राहुरीत ८ व ९ ऑगस्ट रोजी ऑपरेशन शिबिर; विविध शस्त्रक्रियांवर ३० ते ४० टक्के सवलत - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत ८ व ९ ऑगस्ट रोजी ऑपरेशन शिबिर; विविध शस्त्रक्रियांवर ३० ते ४० टक्के सवलत

राहुरी(वेबटीम )  राहुरी शहरातील मुळामाई हॉस्पिटल येथे ८ आणि ९ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य ऑपरेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जनरल व ...

राहुरी(वेबटीम)



 राहुरी शहरातील मुळामाई हॉस्पिटल येथे ८ आणि ९ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य ऑपरेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जनरल व सर्जिकल विभागातील विविध शस्त्रक्रियांवर ३० ते ४० टक्के सवलत देण्यात येणार असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली आहे.

या दोन दिवसीय शिबिरात मूळव्याध, भगंदर, फिशर, अपेंडिक्स, हर्निया, मूत्रखडा, प्रोस्टेट, स्तनातील गाठी, थायरॉईड, शरीरावरील गाठी, तसेच लेसरद्वारे विविध शस्त्रक्रिया अशा अनेक उपचारांची सुविधा उपलब्ध असणार आहे. याशिवाय सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या, रक्त तपासणीवर ४० टक्के सवलत, औषधांवर १० टक्के सवलत तसेच ईसीजी केवळ १०० रुपयांत करण्यात येणार आहे.

हे शिबिर सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत होणार असून रुग्णांनी या सवलतीच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुळामाई हॉस्पिटलचे डॉ. शुभम खंडागळे व डॉ. तेजल खंडागळे यांनी केले आहे. हॉस्पिटलमध्ये २४ तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.


मो-8208888960

8104438873

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत