देवळाली प्रवरा होमगार्ड कार्यालयात उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा होमगार्ड कार्यालयात उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा

  देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील बाजारतळ परिसरातील होमगार्ड कार्यालयात भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील बाजारतळ परिसरातील होमगार्ड कार्यालयात भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्ष सत्यजित कदम, मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील, नगरसेवक प्रकाश संसारे, अमोल कदम, सौरभ मुसमाडे, भारत शेटे, देवराम कडू, प्रभारी अधिकारी अनिल कदम यांच्यासह होमगार्ड जवान उपस्थित होते.

संतोष निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली होमगार्ड जवानांनी तिरंग्यास मानवंदना देत शिस्तबद्ध संचलन केले. देशभक्तीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने उपस्थितांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी होमगार्ड जवानांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत