राहुरी (प्रतिनिधी) राहुरी येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असताना कोविडच्या कठीण काळात उल्लेखनीय कार्य करणारे तसेच सर्वसामान्य नागरिकांशी सुसंव...
राहुरी (प्रतिनिधी)
राहुरी येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असताना कोविडच्या कठीण काळात उल्लेखनीय कार्य करणारे तसेच सर्वसामान्य नागरिकांशी सुसंवाद आणि प्रभावी समन्वय साधणारे एफ.आर. शेख यांना उपजिल्हाधिकारी पदावर बढती मिळाली आहे. सध्या ते बार्शी तहसील कार्यालयात तहसीलदार म्हणून कार्यरत असून, त्यांच्या पदोन्नतीचे वृत्त समोर आल्यानंतर राहुरी परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
राहुरीतील तहसीलदार म्हणून कार्यकाळात शेख यांनी महसूल प्रशासनाच्या नियमित कामकाजासोबतच नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहिले. तहसील कार्यालयाशी संबंधित कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि संबंधित विभागांशी समन्वय साधून प्रश्न मार्गी लावण्यावर त्यांनी भर दिला. त्यामुळे अधिकारी म्हणून त्यांच्याबद्दल नागरिकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली.
कोविड काळातील कार्य ठरले उल्लेखनीय
कोरोना महामारीच्या काळात प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.
राहुरीनंतर शेख यांची बार्शी तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली. बार्शी येथेही त्यांनी प्रशासकीय जबाबदारी सांभाळताना महसूल विभागाच्या कामकाजात योगदान दिले. आता त्यांना उपजिल्हाधिकारी पदावर बढती मिळाल्याने त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
उपजिल्हाधिकारी म्हणून बढती मिळाल्यानंतर एफ.आर. शेख यांची पुढील नियुक्ती नेमकी कोणत्या ठिकाणी होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. येत्या ८ ते १५ दिवसांत त्यांचे पोस्टिंग निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील नियुक्तीकडे प्रशासनासह राहुरीकरांचेही लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत