ओम इलेक्ट्रॉनिक्सच्या लकी ड्रॉची सोडत संपन्न; ११ ग्राहक विजेते - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ओम इलेक्ट्रॉनिक्सच्या लकी ड्रॉची सोडत संपन्न; ११ ग्राहक विजेते

राहुरी(वेबटीम)  स्वातंत्र्य दिनानिमित्त राहुरी फॅक्टरी येथील ओम इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सर्वात स्वस्त ७ दिवस’ या वि...

राहुरी(वेबटीम)



 स्वातंत्र्य दिनानिमित्त राहुरी फॅक्टरी येथील ओम इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सर्वात स्वस्त ७ दिवस’ या विशेष योजनेतील लकी ड्रॉची सोडत शुक्रवारी दि. २१ ऑगस्ट) उत्साहात पार पडली. या सोडतीत विविध आकर्षक बक्षिसांचे ११ ग्राहक विजेते ठरले. सोडत दुपारी १२ वाजता इन्स्टाग्राम लाईव्हद्वारे जाहीर करण्यात आली.


या लकी ड्रॉमध्ये प्रथम क्रमांकाचे रेफ्रिजरेटरचे बक्षीस विशाल अनाप (सोनगाव) यांनी पटकावले. द्वितीय क्रमांकाचे एलईडी टीव्हीचे बक्षीस किरण भाऊसाहेब जाधव (टाकळीमिया) यांना मिळाले. तृतीय क्रमांकाची वॉशिंग मशीन प्रशांत मुसमाडे (देवळाली प्रवरा) यांना, तर चौथ्या क्रमांकाचे होम थिएटर नवनाथ बागुल (शेरीचिकलठाण) यांना मिळाले.

पाचव्या क्रमांकाचे इंडक्शन सबुरी शेजूळ (राहुरी फॅक्टरी), सहाव्या क्रमांकाची इस्त्री ओम सुनील पाचपिंड (श्रीरामपूर), सातव्या क्रमांकाची इस्त्री मयूर मोरे (राहुरी फॅक्टरी), आठव्या क्रमांकाची इस्त्री अजित कदम (देवळाली प्रवरा) यांनी जिंकली.

नवव्या क्रमांकाचे इलेक्ट्रिक कॅटल सोनम गणेश भवाल (टाकळीमिया), दहाव्या क्रमांकाचे इलेक्ट्रिक कॅटल नदीम पठाण (चिंचाविहिरे), तर अकराव्या क्रमांकाचे इलेक्ट्रिक कॅटल काशिनाथ पवार (तांभेरे) यांना मिळाले.

लकी ड्रॉच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षक बक्षिसे देत विश्वास कायम ठेवल्याबद्दल ओएम इलेक्ट्रॉनिक्सकडून सर्व विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले. या योजनेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पियुष व तन्मय चोरडिया यांच्या वतीने सांगण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत