वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सव अध्यक्षपदी प्रदीप विटनोर; उपाध्यक्षपदी अमोल वाळुंज यांची निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सव अध्यक्षपदी प्रदीप विटनोर; उपाध्यक्षपदी अमोल वाळुंज यांची निवड

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)  सामाजिक, धार्मिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षीच्या नवरात्...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



 सामाजिक, धार्मिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षीच्या नवरात्र उत्सवाच्या आयोजनासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नवरात्र उत्सवासाठी सन २०२६-२७ ची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.


स्थानिक कलावंत, महिला तसेच शाळकरी मुलांना आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच दरवर्षी नवीन सभासदांना कार्यकारिणीत सहभागी करून घेत त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपविण्याची परंपरा प्रतिष्ठानने कायम ठेवली आहे.


यावर्षीच्या नवरात्र उत्सवाच्या अध्यक्षपदी श्री. प्रदीप विटनोर, तर उपाध्यक्षपदी श्री. अमोल वाळुंज यांची निवड करण्यात आली.


वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान कार्यकारिणी २०२६-२७

अध्यक्ष : श्री. प्रदीप विटनोर

उपाध्यक्ष : श्री. अमोल वाळुंज

कार्याध्यक्ष : श्री. मयूर मोरे

व्यवस्थापक : श्री. सुनील जाधव

सल्लागार : श्री. अविनाश गायके

खजिनदार : श्री. सुजित सिनारे

सह-खजिनदार : चि. सचिन कदम

संघटक : चि. मनोज तांबे

संपर्क प्रमुख : श्री. मनोज गावडे

सचिव : श्री. चारुदत्त दौंड

सह-सचिव : श्री. सोमनाथ गुंजकर

प्रसिद्धी प्रमुख : श्री. सूरज गागरे

सह-प्रसिद्धी प्रमुख : चि. वैभव कदम



यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक तथा नगरसेवक श्री. वसंत कदम, तसेच जालिंदर दोंड, अमोल कदम, विजय मोरे, बाबासाहेब खांदे, विलास काळे, बाळासाहेब वाळुंज, प्रसाद कदम, महेंद्र दोंड, नितीन मोरे, राकेश बोरसे, मयूर घावटे, संजय धुमाळ, रोहित शिंदे, पियुष झंवर, प्रथमेश थोरात, ज्ञानेश्वर गागरे, सार्थक नेहे यांच्यासह प्रतिष्ठानचे इतर सभासद उपस्थित होते.


नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून यावर्षीचा नवरात्र उत्सव अधिक उत्साहात, शिस्तबद्ध पद्धतीने तसेच विविध नाविन्यपूर्ण सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत