देवळाली प्रवरातील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सचिन रणधीर तर उपाध्यक्षपदी स्नेहल वाळुंज यांची निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरातील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सचिन रणधीर तर उपाध्यक्षपदी स्नेहल वाळुंज यांची निवड

देवळाली प्रवरा/वेबटीम:- येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी शासनाच्या नियमांनुसार श...

देवळाली प्रवरा/वेबटीम:-

येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी शासनाच्या नियमांनुसार शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली. या समितीचा कार्यकाळ दोन वर्षांचा राहणार आहे.


इयत्ता ५वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांमधून एकूण १८ सदस्यांची समितीवर निवड करण्यात आली. त्यामधून सचिन रणधीर यांची अध्यक्षपदी, तर स्नेहल रविंद्र वाळुंज यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य श्री. मकरंद दिगंबर रायते हे समितीचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत.


नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा विद्यालयाचे प्राचार्य श्री रायते , उपमुख्याध्यापिका श्रीमती दिघे, व पर्यवेक्षक श्री डोफे यांच्या उपस्थितीत तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री. महेश गडाख व माजी उपाध्यक्ष  सुप्रिया किशोर कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीच्या कामकाजासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकांचे सहकार्य लाभले. नवनिर्वाचित समितीच्या माध्यमातून विद्यालयाच्या शैक्षणिक व प्रशासकीय प्रगतीसाठी सकारात्मक कामकाज होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत