देवळाली प्रवरा(वेबटीम) श्रावण शुक्ल एकादशी अर्थात पुत्रदा एकादशीच्या तारखेबाबत यंदा सूर्योदयाच्या वेळेनुसार काही भागांत फरक पडत असल्याचा खुल...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
श्रावण शुक्ल एकादशी अर्थात पुत्रदा एकादशीच्या तारखेबाबत यंदा सूर्योदयाच्या वेळेनुसार काही भागांत फरक पडत असल्याचा खुलासा देवळाली प्रवरा येथील श्री गुरुकृपा ज्योतिष कार्यालयाचे श्री. दिनेश विजय जोशी (गुरु) यांनी केला आहे. त्यामुळे विविध प्रदेशांमध्ये एकादशीचे व्रत वेगवेगळ्या दिवशी करण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
श्रावण शुक्ल एकादशीची तिथी रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी असून एकादशी तिथीची समाप्ती २८ तास १९ मिनिटांनी, तर त्यानंतरच्या द्वादशी तिथीची समाप्ती ३० तास २१ मिनिटांनी होत असल्याचे पंचांगानुसार सांगण्यात आले आहे.
ज्या गावांमध्ये २५ ऑगस्ट रोजी सकाळी ६.२१ पूर्वी सूर्योदय होत आहे, अशा प्रदेशांमध्ये द्वादशी तिथीची वृद्धी होत असल्याने २३ ऑगस्ट रोजी स्मार्त एकादशी आणि २४ ऑगस्ट रोजी भागवत एकादशी पाळावी, असे सांगण्यात आले आहे.
यामध्ये मुंबई व कोकण किनारपट्टी वगळता संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक तसेच गुजरातमधील अहमदाबाद, वडोदरा आणि त्याच्या पूर्वेकडील प्रदेशांचा समावेश होतो. या भागांतील भाविकांनी २३ ऑगस्ट रोजी स्मार्त आणि २४ ऑगस्ट रोजी भागवत एकादशी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, ज्या गावांमध्ये २५ ऑगस्ट रोजी सकाळी ६.२१ नंतर सूर्योदय होत आहे, अशा भागांत त्रयोदशी तिथीची वृद्धी होत असल्याने २३ ऑगस्ट रोजीच एकच एकादशी राहणार आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, चिपळूण, दापोलीसह संपूर्ण कोकण, संपूर्ण गोवा तसेच गुजरातमधील सुरत, राजकोट व जुनागढ आदी भागांत २३ ऑगस्ट रोजीच एकादशी करावी, असा खुलासा करण्यात आला आहे.
त्यामुळे भाविकांनी आपल्या गावातील सूर्योदयाची वेळ व स्थानिक पंचांगाचा विचार करून पुत्रदा एकादशीचे व्रत करावे, असे श्री गुरुकृपा ज्योतिष कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
— श्री गुरुकृपा ज्योतिष कार्यालय
श्री. दिनेश विजय जोशी (गुरु)
मो. ८०५५४२२१९, ९०९६२२१६३१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत