वांबोरी(वेबटीम) गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली वांबोरी शासकीय लिफ्ट योजना पुन्हा सुरू होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. याबाबत लाभध...
वांबोरी(वेबटीम)
गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली वांबोरी शासकीय लिफ्ट योजना पुन्हा सुरू होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. याबाबत लाभधारक शेतकऱ्यांनी आज (दि. ३० ऑगस्ट) ज्येष्ठ नेते सुभाषरावजी पाटील यांची भेट घेऊन योजना पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा केली.
यावेळी सुभाषरावजी पाटील यांनी सांगितले की, ही योजना पुन्हा सुरू करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून आपले प्रयत्न सुरू आहेत. आता योजनेचा नव्याने सर्वे करण्यात येणार असून, सर्वेक्षणानंतर योजना सुरू करण्यासाठी पुढील प्रक्रिया केली जाणार आहे.
यावेळी पाटील यांनी शासकीय लिफ्ट योजनेचे ओएसडी श्री. सानप यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. स्पीकरवरून झालेल्या चर्चेत श्री. सानप यांनी लाभधारक शेतकऱ्यांना योजनेच्या सद्यस्थितीची माहिती दिली. दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सर्वेक्षणासाठी निधी मंजूर करण्याबाबत बैठक होणार असून, त्यानंतर योजनेचा सर्वे केला जाईल. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर लिफ्ट योजना पुन्हा सुरू करण्याची पुढील कार्यवाही सुरू केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
लिफ्ट योजना अनेक वर्षांपासून बंद असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे योजना लवकरात लवकर सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी लाभधारकांनी केली.
यावेळी श्याम पटारे, सुरज शर्मा, बंडू मोरे, सचिन गडाख, महेश मोरे, संदीप पटारे, केरू बापू साळुंके, संदीप कार्ले, नितीन मोरे, राजीव मोरे, रोहिदास कुऱ्हे, महादू ढोके, दत्तात्रय गांधले, आबा पाटील यांच्यासह लाभधारक शेतकरी उपस्थित होते. योजना पूर्णपणे सुरू होईपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी विनंती यावेळी लाभधारकांनी सुभाषरावजी पाटील यांच्याकडे केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत