देवळाली प्रवरातील 'या' समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मनोज जरांगे पाटील उपोषणस्थळी भेट - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरातील 'या' समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मनोज जरांगे पाटील उपोषणस्थळी भेट

  देवळाली प्रवरा(वेबटीम)  मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी अंतरवली सराटी येथे सुरू असलेल्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)



 मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी अंतरवली सराटी येथे सुरू असलेल्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास मानव अधिकार संरक्षण समिती, अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने जाहीर व पूर्ण पाठिंबा देण्यात आला.देवळाली येथील पदाधिकाऱ्यांनी अंतरवालीत भेट देऊन उपोषणास पाठिंबा दिला

मानव अधिकार संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना पाठिंब्याचे निवेदन दिले. मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या संघर्षाकडे सामाजिक न्यायाच्या व्यापक दृष्टिकोनातून पाहत असल्याचे समितीने निवेदनात म्हटले आहे.

मराठा समाजातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी, युवक व विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेला लढा हा समाजाच्या न्याय, हक्क आणि स्वाभिमानाशी निगडित असल्याची भावना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांकडे कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता संवेदनशीलतेने व गांभीर्याने पाहून सकारात्मक आणि कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. युवकांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न मार्गी लावून समाजाला न्याय मिळावा, अशी अपेक्षा समितीने व्यक्त केली.

यावेळी मानव अधिकार संरक्षण समितीचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष लिंबाजी लोभाजी इंगावले, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष दत्तात्रय जयवंत गडाख, जिल्हा संघटक भिकचंद पुंजाजी वरघुडे, देवळाली प्रवरा शहराध्यक्ष संदीप भानुदास कदम तसेच अहिल्यानगर संघटक प्रकाश देशमुख उपस्थित होते.

मनोज जरांगे पाटील यांच्या न्याय्य संघर्षाला मानव अधिकार संरक्षण समिती, अहिल्यानगर जिल्ह्याचा नैतिक, सामाजिक व संघटनात्मक पाठिंबा कायम राहील आणि मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी समिती खंबीरपणे सोबत उभी राहील, असा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत