देवळाली प्रवरा येथे धर्मयोद्धा ग्रुपची दहीहंडी उत्साहात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा येथे धर्मयोद्धा ग्रुपची दहीहंडी उत्साहात

  देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे धर्मयोद्धा ग्रुपच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. बा...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे धर्मयोद्धा ग्रुपच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. बाजारतळावर आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवाला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी एकलव्य ग्रुपने दहीहंडी फोडत ५ हजार ५०० रुपयांचे बक्षीस पटकावले. दहीहंडी फोडण्याच्या थराराचा उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आनंद घेतला.



कार्यक्रमानंतर पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव व केदारनाथ चव्हाण यांच्या हस्ते विजेत्या संघाला पारितोषिक प्रदान करण्यात आले.

दहीहंडी उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अजिंक्य थोरात, दिनेश बानायतकर, गणेश सोनवणे, विशाल कडू, प्रफुल्ल गरुड, दीपक भालेकर, अतुल कदम, विजय कुमावत, श्री. वर्पे, पोपट मुसमाडे यांच्यासह धर्मयोद्धा ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत