लोणीतील तरुणावर जीवघेणा हल्ला राहुरी फॅक्टरीतील दोघे अटकेत, पोलीस कोठडीत रवानगी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

लोणीतील तरुणावर जीवघेणा हल्ला राहुरी फॅक्टरीतील दोघे अटकेत, पोलीस कोठडीत रवानगी

राहाता/वेबटीम:- राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील ब्राम्हणे वस्ती परिसरात नागेश शंकर लोट (वय ३८) यांच्यावर तलवार, चाकू आणि लोखंडी पाईपने ज...

राहाता/वेबटीम:-

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील ब्राम्हणे वस्ती परिसरात नागेश शंकर लोट (वय ३८) यांच्यावर तलवार, चाकू आणि लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी लोणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. सागर कांतीलाल उल्हारे (वय २७, रा. प्रसादनगर, राहुरी कारखाना) आणि विठ्ठल उर्फ बंटी माणिक गर्जे (वय २४, रा. साखर कारखाना कामगार वसाहत, राहुरी कारखाना) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

५ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८.१० वाजता नागेश लोट हे ड्युटी संपवून घरी जात असताना पी. व्ही. पी. कॉलेजजवळील ब्राम्हणे वस्ती परिसरातील सिमेंटच्या रस्त्यावर दोन मोटारसायकलींवरून आलेल्या चार ते पाच जणांनी त्यांची दुचाकी अडवली. त्यानंतर हल्लेखोरांनी चाकू, तलवार आणि लोखंडी पाईपने त्यांच्या हातावर, पाठीवर व डोक्यावर हल्ला केला. या हल्ल्यात नागेश लोट गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर प्रवरा हॉस्पिटल, लोणी येथे उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर नागेश यांचे भाऊ नविन शंकर लोट यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ४५१/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, उपचारादरम्यान ७ सप्टेंबर रोजी नागेश लोट यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबातून हल्ल्यामागील कारणाची माहिती समोर आली. त्यांच्या जबाबानुसार, लोणी खुर्द येथील विकी राक्षे हा त्याच्या पुतणीला त्रास देऊन धमकावत होता. त्यामुळे नागेश यांनी पुतणीचे सिमकार्ड काढून घेत तिला पुणे येथे नातेवाईकांकडे पाठवले. याच कारणाचा राग मनात धरून विकी राक्षे याने आपल्यावर हल्ला घडवून आणल्याचा आरोप नागेश यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात केला आहे.

पोलिसांच्या तांत्रिक तपासात विकी राक्षे आणि सागर उल्हारे हे घटनेच्या दिवशी एकमेकांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी सागर उल्हारे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने विकी राक्षेच्या सांगण्यावरून नागेश लोट यांच्यावर हल्ला केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच विठ्ठल उर्फ बंटी गर्जे हा देखील हल्ल्यात सहभागी असल्याचे समोर आले.

हल्ल्यात वापरण्यात आलेली तलवार, चाकू, लोखंडी पाईप तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे. हल्ल्याचा कट नेमका कुठे रचण्यात आला, यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे आणि आरोपींना विकी राक्षे याच्याकडून पैसे देण्यात आले होते का, या सर्व बाबींचा तपास केला जात आहे.

दरम्यान, घटनास्थळावरून तसेच जखमी नागेश लोट यांच्या ताब्यातील रक्तसदृश डाग असलेले कपडे, बूट, चष्मा आदी साहित्य पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणात सागर उल्हारे आणि विठ्ठल उर्फ बंटी गर्जे यांना ७ सप्टेंबर रोजी रात्री अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी विकी राक्षे आणि त्याच्या इतर साथीदारांचा लोणी पोलिसांकडून शोध सुरू आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत