आण्णासाहेब कदम पाटील शेती व ग्रामविकास प्रतिष्ठाणच्या वतीने कांदा उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण उत्साहात संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आण्णासाहेब कदम पाटील शेती व ग्रामविकास प्रतिष्ठाणच्या वतीने कांदा उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण उत्साहात संपन्न

देवळाली प्रवरा/वेबटीम:- आण्णासाहेब कदम पाटील शेती व ग्रामविकास प्रतिष्ठाण, लक्ष्मणबाग, देवळाली प्रवरा यांच्या वतीने कांदा उत्पादन तंत्रज्ञान...

देवळाली प्रवरा/वेबटीम:-

आण्णासाहेब कदम पाटील शेती व ग्रामविकास प्रतिष्ठाण, लक्ष्मणबाग, देवळाली प्रवरा यांच्या वतीने कांदा उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम आज, रविवार दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी ग्रामविकास प्रशिक्षण केंद्र, लक्ष्मणबाग येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, उत्पादन खर्च कमी करून उत्पादन व गुणवत्ता वाढविता यावी, या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रशिक्षणामध्ये श्री. शिवाजीराव जगताप (माजी कृषी सहसंचालक) आणि प्रा. श्री. चिमाजीराव बाचकर (M.Sc. कृषी रोगशास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी) यांनी दोन सत्रांमध्ये शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. कांदा उत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञान, लागवड पद्धती, रोग व कीड व्यवस्थापन, उत्पादन वाढीसाठी आवश्यक बाबी आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षणादरम्यान PPT द्वारे प्रकल्पाची माहिती तसेच विविध प्रात्यक्षिकात्मक व्हिडिओ दाखवून विषयाचे सुलभ स्पष्टीकरण करण्यात आले. शेतकऱ्यांनी विविध प्रश्न व शंका उपस्थित केल्या असता दोन्ही तज्ज्ञ मार्गदर्शकांनी त्यांचे समाधानकारक निरसन केले.

या प्रशिक्षणासाठी १२ गावांमधून तसेच अहिल्यानगरसह एकूण ३ जिल्ह्यांमधून ४२ शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि प्रशिक्षणादरम्यान झालेली प्रश्नोत्तरे यामुळे कार्यक्रम अत्यंत उपयुक्त व परिणामकारक ठरला.

प्रशिक्षणाच्या निमित्ताने SP Agro यांच्या आधुनिक कांदा लागवड यंत्राची प्रत्यक्ष माहिती व प्रात्यक्षिकाची संधी शेतकऱ्यांना मिळाली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा उत्पादनात सुधारणा करण्यासाठी हे प्रशिक्षण निश्चितच दिशादर्शक ठरेल, असा विश्वास उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

“कांदा उत्पादन वाढवूया, शेतकरी समृद्ध बनवूया!” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल सहभागी शेतकऱ्यांनी आण्णासाहेब कदम पाटील शेती व ग्रामविकास प्रतिष्ठाणचे कौतुक व आभार व्यक्त केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत