राहुरी फॅक्टरीत राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानचा २७ वा गणेशोत्सव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानचा २७ वा गणेशोत्सव

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) ताहाराबाद रोड येथील राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या वतीने यंदा गणेशोत्सवाचे २७ वे वर्ष साजरे करण्यात येत आहे. यानिमि...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



ताहाराबाद रोड येथील राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या वतीने यंदा गणेशोत्सवाचे २७ वे वर्ष साजरे करण्यात येत आहे. यानिमित्त गणपती बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी करण्यात आली असून, गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून मिरवणूक काढण्यात येणार आहे. बारामती बँड तसेच पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक उत्साहात निघणार असून, परिसरातील गणेशभक्त व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

मिरवणुकीनंतर सायंकाळी ७ वाजता अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या हस्ते गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. धार्मिक वातावरणात होणाऱ्या या प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून विविध तयारी करण्यात आली आहे.

राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या २७ वर्षांपासून गणेशोत्सवाची परंपरा जपली जात आहे. यंदाही गणेशोत्सव उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गणेशभक्तांनी मिरवणूक तसेच प्रतिष्ठापना सोहळ्यास उपस्थित राहून गणरायाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत