राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- येथील गुरुकुल वसाहतीतील पावन गणपती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाचे उत्साहात आगमन करण्यात आले. गण...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
येथील गुरुकुल वसाहतीतील पावन गणपती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाचे उत्साहात आगमन करण्यात आले. गणरायाच्या आगमनाने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, भाविकांनी मोठ्या उत्साहात बाप्पाचे स्वागत केले.
गणपती प्रतिष्ठापना विधीचे पौरोहित्य श्री. नवले गुरुजी यांनी केले. यावेळी कुमारी सेजल गोपाल शिंदे यांच्या हस्ते गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.
या प्रसंगी गोपाल शिंदे, अरुण गायकवाड, विलास अल्हाडे, बाळासाहेब तुपे, नरेंद्र कोंडेकर, मनोज अल्हाडे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत