पानेगांव (वार्ताहर) नेवासा तालुक्यातील नामांकित संस्था म्हणून कार्यरत असणाऱ्या पानेगांव विविध कार्यकारी सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण स...
पानेगांव (वार्ताहर)
नेवासा तालुक्यातील नामांकित संस्था म्हणून कार्यरत असणाऱ्या पानेगांव विविध कार्यकारी सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन शिवाजी राजाराम जंगले यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या प्रांगणात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सभेत संस्थेच्या आर्थिक व्यवहारांसह आगामी वर्षातील कर्जवाटप, अंदाजपत्रक, लेखापरीक्षण आदी विविध विषयांवर संस्थेचे सचिव एस.जी जंगले यांनी
सभेच्या प्रारंभी मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून त्यास मंजुरी संचालक, सभासद यांच्या वतीने देण्यात आली. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील वार्षिक हिशोबाची पत्रके, ताळेबंद तसेच नफा-तोटा पत्रक सभेसमोर सादर करून त्यास मंजुरी देण्यातआली. सन २०२६-२७ या वर्षासाठी सभासदांना पिकांसाठी अल्पमुदत, मध्यम मुदत व दीर्घ मुदतीची तसेच इतर कर्जप्रकरणे तयार करून बँकेकडे मंजुरीसाठी पाठविण्याचा अधिकार पंचकमिटीला देण्याबाबत चर्चा करण्यात आली. सन २०२५-२६ च्या ऑडिट मेमोचे वाचन करून त्यातील मुद्यांची माहिती सभासदांना देण्यात आली.याशिवाय सन २०२६-२७ या वर्षाचे उत्पादन व खर्चाचे अंदाजपत्रक सभेसमोर मांडून त्यास मंजुरी देण्यात आली. सभासदांकडील येणे बाकी व थकबाकीबाबतही चर्चा करण्यात आली.
लेखापरीक्षण ऑडिटर बदल करण्याचे अधिकार संस्थेचे चेअरमन शिवाजी जंंगले यांना देण्याचा ठराव संस्थेचे सभासद ज्ञानेश्वर जंगले यांनी मांडला अनुमोदन सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी मुळाचे माजी संचालक रंगनाथ जंगले, पानेगांव ग्रामपंचायत उपसरपंच सुरेश जंगले, संस्थेचे व्हा चेअरमन जालिंदर जंगले, माजी पानेगांव संस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत डॉ जयवंतराव गुडधे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक जालिंदर जंगले, आर,डी जंगले,माजी चेअरमन गंगाधर जंगले, संचालक राजेंद्र जंगले, अशोकराव गागरे, तानाजी गायकवाड, दिलीप गुडधे, बबनराव जंगले, बाळासाहेब चिंधे, भाऊसाहेब वाघमारे, नारायण जंगले, पांडुरंग जंगले, जगन्नाथ जंगले, अर्जुन जंगले, बहिरनाथ तनपुरे माजी सरपंच मच्छिंद्र जंगले,यमनाथ जंगले बाळासाहेब कल्हापुरे, विलासराव जंगले,राजेंद्र वाघमारे यांच्यासह संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे संचालक साहेबराव जंगले यांनी उपस्थितांचे आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत