धन्वंतरी कामगार सहकारी पतसंस्थेची ३४ वी वार्षिक सभा उत्साहात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

धन्वंतरी कामगार सहकारी पतसंस्थेची ३४ वी वार्षिक सभा उत्साहात

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)  येथील धन्वंतरी रुग्णालय व महाविद्यालय कामगार सहकारी पतसंस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे संचालक तथा श...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



 येथील धन्वंतरी रुग्णालय व महाविद्यालय कामगार सहकारी पतसंस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे संचालक तथा शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव हर्ष  तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.


सभेस पतसंस्थेचे चेअरमन गजानन वराळे, व्हाइस चेअरमन विजय डुकरे, जेष्ठ संचालिका चेतना कुलकर्णी ,डॉ.अनंतकुमार शेकोकार,निलेश जाधव ,दत्तात्रय चव्हाण,दत्तात्रय हिवाळे, ज्ञानेश्वर टिक्कल, शोभा ठुबे, विमल हुडे ,सेक्रेटरी जी. डी. बोर्डे तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी विवेकानंद नर्सिंग होममधील सेवानिवृत्त कर्मचारी भारत खिलारी ,कैलास कदम ,श्रीराम कोबरणे, सौ.नंदा कायगूडे श्रीमती देव्हारे यांचा पतसंस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या पाल्यांचा सन्मानपत्र व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. डॉक्टरेट पदवी मिळविल्याबद्दल निलेश जाधव यांचाही हर्ष तनपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


यावेळी बोलताना हर्ष तनपुरे म्हणाले, “धन्वंतरी पतसंस्था ही भांडवलीदृष्ट्या सक्षम संस्था असून संस्थेची आर्थिक परिस्थिती प्रगतीपथावर आहे. संस्थेचे भवितव्य उज्ज्वल आहे. भविष्यातही डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ पतसंस्थेला आवश्यक ते सहकार्य करेल.”

पतसंस्था चालविताना चेअरमन गजानन वराळे व संचालक मंडळाने विश्वास व कामकाजातील पारदर्शकता कामगार सभासदांचे हित जपले आहे असेही तनपुरे यांनी नमूद केले.


चेअरमन गजानन वराळे यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल सभेसमोर सादर केला. संस्थेला झालेल्या नफ्यातून यावर्षी सभासदांना ९ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट चे अध्यक्ष अरुण  तनपुरे व विश्वस्त मंडळांचे मार्गदर्शन तसेच सभासदांचे सातत्यपूर्ण सहकार्य लाभत असल्याने संस्था चांगल्या पद्धतीने प्रगती करत असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी सदर सभेस जेष्ठ सभासद डॉ  विलास कड, डॉ.बांगर, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य संजय नागरगोजे नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य मच्छिंद्र गागरे , धन्वंतरी चे माजी चेअरमन भगवान म्हसे आदिंसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेचे सूत्रसंचालन डॉ सतीश धोंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री.विजय डुकरे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत