अहिल्यानगर(वेबटीम) नागरिकांची कोट्यवधींनी फसवणूक करणाऱ्या समर्थ क्रॉप केअर कंपनी विरोधात अखेर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मानव अधि...
अहिल्यानगर(वेबटीम)
नागरिकांची कोट्यवधींनी फसवणूक करणाऱ्या समर्थ क्रॉप केअर कंपनी विरोधात अखेर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्लीने दिलेल्या निवेदनानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
दि. १९/०५/२०२६ रोजी महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी जी. एम. भगत यांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन कंपनीची स्थावर मालमत्ता जप्त करून चेअरमन-डायरेक्टरवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती.
या निवेदनाची दखल घेत अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने कंपनी विरोधात चौकशी व मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची पडताळणी सुरू असून लवकरच गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
यावेळी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष लिंबाजी इंगवले, भिकचंद वरघुडे जिल्हा संघटक, दत्तात्रय गडाख जिल्हा अध्यक्ष, दीपक आढाव सर जनसंपर्क अधिकारी अहिल्यानगर जिल्हा, संदिप कदम देवळालीप्रवरा शहर अध्यक्ष, ॲड. स्नेहलताई सांगळे महिला जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते.
मानव अधिकार संरक्षण समितीच्या या धडक कारवाईमुळे फसवणूक झालेल्या शेकडो गुंतवणूकदारांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत