राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील श्रीशिवाजीनगर, चाळ क्रमांक २३/२७ येथे सिद्धिविनायक मित्रमंडळ व छावा प्रतिष्ठान यांच्या वतीने स...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील श्रीशिवाजीनगर, चाळ क्रमांक २३/२७ येथे सिद्धिविनायक मित्रमंडळ व छावा प्रतिष्ठान यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही श्री सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले असून, त्यानंतर सायंकाळी ५ वाजता महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या धार्मिक कार्यक्रमाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा, तसेच श्री सत्यनारायण पूजेत सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिद्धिविनायक मित्रमंडळ व छावा प्रतिष्ठान, शिवाजीनगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत