राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील साईसेवा नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण नुकतेच संस्थेचे अध्यक्ष प्रदीप लक्ष्मण ये...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
संस्थेस सन २०२५-२६ या अहवाल सालात १५,८९,०६४/- इतका ढोबळ नफा झाल्याचे सांगितले. त्याच प्रमाणे संस्थेचे जेष्ठ संचालक शिवाजी हरिभाऊ बंगाळ यांनी संस्थेच्या आर्थिक स्थितीचे विवरण सभेसमोर सदर केले. तसेच संस्था सर्व तुलनात्मक, कायदेशीर बाबी व पोट नियमाचे पालन करूनच कारभार करीत असल्याचे सांगितले. व उपस्थित असलेल्या सर्व सभासद व संचालक मंडळास संस्थेच्या ठेवी वाढवण्याबाबत आवाहन केले.
संस्थेचे संचालक सतिश केरू वाघ, दत्तात्रय गाडे, बाळासाहेब भिकाजी तुपे, यांनी या संस्थेचा कारभार काटकसरीने व नियमाप्रमाणे व्यवस्थित चालू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. व ठेवीचे उदिष्टे वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. भविष्यात संस्थेचा लाभांश देण्याचा संकल्प आहे.
संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस संस्थेचे संचालक दत्तात्रय गाडे, सतीशराव वाघ, बाळासाहेब तुपे, श्रीनिवास शिंदे, सुलोचना भवाळ, राजेंद्र बिडगर, मनोहर ढुस, सभासद शिवाजीराव भवाळ तसेच संस्थेचे व्यवस्थापक मयूर जोशी, गणेश चिंधे व इतर सभासद हजर होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत