क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नागरी सहकारी पतसंस्थेची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नागरी सहकारी पतसंस्थेची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

राहुरी/वेबटीम:-  राहुरी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नागरी सहकारी पतसंस्थेची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. २० सप्टेंबर रो...

राहुरी/वेबटीम:- 

राहुरी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नागरी सहकारी पतसंस्थेची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी राहुरी फॅक्टरी येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. संस्थेचे चेअरमन जनार्दन निमसे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते.

सभेच्या प्रारंभी संस्थेचे व्यवस्थापक कैलास शिंदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संस्थेच्या विविध कामकाजाबाबत तसेच संस्थेच्या प्रगतीबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.

प्रसंगी चेअरमन जनार्दन निमसे, गणेश शेजुळ, प्रशांत तांबे, सचिन निमसे, सतीश संसारे, बाळासाहेब आढाव, अजय खिलारी, संदीप पानसंबळ, महेश निमसे, आप्पासाहेब कोहकडे, आदिनाथ तांबे, भगवान चौधरी, शरद मोरे, तुकाराम मोरे, नितीन डमाळे, ऋषी राऊत, कैलास मुसमाडे, संजय शेटे, गुलाब निमसे, शंकर निमसे, अभिषेक राऊत आदी उपस्थित होते.

सभेतील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. उपस्थित सभासदांनी संस्थेच्या कामकाजाबाबत सकारात्मक सहभाग नोंदविला. शेवटी संस्थेचे संचालक सतीश संसारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत