आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेकडून सभासदांना ११ टक्के लाभांश जाहीर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेकडून सभासदांना ११ टक्के लाभांश जाहीर

  राहुरी(वेबटीम) आदर्श नागरी सहकारी पतसंस्था लि., शिवाजीनगर ता. राहुरी या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार प...

 राहुरी(वेबटीम)



आदर्श नागरी सहकारी पतसंस्था लि., शिवाजीनगर ता. राहुरी या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी संस्थेचे चेअरमन सुधाकर कदम यांनी पतसंस्थेच्या आर्थिक प्रगतीचा लेखाजोखा सभासदांसमोर मांडला.  सभासदांना ११ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.

​         सभेला संबोधित करताना सभेचे अध्यक्ष व चेअरमन सुधाकर कदम म्हणाले की, सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांचा पतसंस्थेवर असलेला दृढ विश्वास यामुळेच संस्थेने आर्थिक क्षेत्रात ही उत्तुंग भरारी घेतली आहे. 

यावेळी संस्थेचे मार्गदर्शक अण्णासाहेब चोथे यांनी सांगितले की,पारदर्शक कारभार आणि उत्कृष्ट ग्राहकसेवेमुळे पतसंस्था सातत्याने प्रगतीपथावर आहे.संस्थेचा वसूल भागभांडवल: १ कोटी १५ लाख रुपये आहे ​ठेवी ९० कोटी रुपये आहे

​स्वनिधी: ३ कोटी ७३ लाख रुपये आहे

​कर्जवाटप: ५६ कोटी २३ लाख रुपये आहे गुंतवणूक ३३ कोटी ६६ लाख रुपये आहे एकूण व्यवसाय (३१/०३/२०२६ अखेर) १३२.१७ कोटी रुपये

​वार्षिक उलाढाल ५०० कोटी ७७ लाख रुपये आहे.यावर्षी सभासदांना ११ टक्के लाभांश देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव कपाळे यांनी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले.

 या सभेस संस्थेचे ज्येष्ठ संचालक  अण्णासाहेब चोथे, व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळूंज, संचालक शिवाजी कपाळे, संचालक अविनाश साबरे, संचालक भारत चोथे, संचालक मारुती खरात, संचालक दत्तात्रय रोडे, संचालिका कमल रामचंद्र काळे तसेच जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर सोनवणे आणि पतसंस्थेचे सर्व अधिकारी, कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​सभेच्या शेवटी संस्थेचे व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळुंज यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.अहवाल वाचन व उपस्थित यांचे स्वागत जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले.यावेळी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर सर्व शाखांचे शाखाप्रमुख कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत