मानोरी(वेबटीम) अहिल्यानगर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग आणि अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या सं...
मानोरी(वेबटीम)
अहिल्यानगर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग आणि अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष पुरस्कार सोहळ्यात श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय, आरडगावचे मुख्याध्यापक शिवाजी एकनाथ म्हसे यांना ‘आदर्श गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले.
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते आणि आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा दिमाखदार वातावरणात पार पडला. शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न तसेच शाळेच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत मुख्याध्यापक शिवाजी म्हसे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पंडित, सचिव मिथुन डोंगरे, शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे, माध्यमिक शिक्षक बँकेचे चेअरमन बाबासाहेब बोडखे, शिक्षण अधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे, वेतन पथकाचे अधीक्षक रामदास म्हस्के, राहुरी तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सर्जेराव पेरणे, अरुण तुपविहीरे, हारदे सर यांच्यासह शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक शिवाजी म्हसे यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत असून आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत