देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा येथील जय बजरंग प्रतिष्ठानच्या वतीने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सत्यजित...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
देवळाली प्रवरा येथील जय बजरंग प्रतिष्ठानच्या वतीने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या हस्ते विधिवत आरती संपन्न झाली. आरतीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या धार्मिक कार्यक्रमास परिसरातील नागरिक व भाविकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे नियोजन करून आयोजन यशस्वी केले.
यावेळी शंकर अण्णा धोत्रे, खली इरले, सचिन कोठुळे, सचिन घोरपडे, ऋतिक धोत्रे, निखिल धोत्रे, अविनाश इरले, पप्पू भारत, भाऊ सोनवणे, विलास धोत्रे, गणेश इरले, अजय धोत्रे, भैय्या सोनवणे, प्रशांत म्हस्के, कैलास धोत्रे, आतिश धोत्रे यांच्यासह जय बजरंग प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत