नेवासा तालुका (प्रतिनिधी ) सुजान नागरिक चांगला माणूस विद्यार्थी जिवनातचं नियमावलीचा अवलंब केल्यास घडतो असं प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे व...
नेवासा तालुका (प्रतिनिधी)
सुजान नागरिक चांगला माणूस विद्यार्थी जिवनातचं नियमावलीचा अवलंब केल्यास घडतो असं प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे यांनी करजगांव ( ता नेवासा) येथे पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात बोलत होते. विद्यार्थीनींनी शालेय जीवनात नियमावली तयार करून आज आपल्या काय अभ्यास करायचा तसेच भविष्यात आपल्याला काय होयचं हे आपण लक्षात घेतले पाहिजे हे रोजचा दिनक्रम असला पाहिजे. मानवी जिवन हे एकदाच आहे आणि त्या पद्धतीने आपण भविष्याचा वेध घेवून आपलं कार्य करा मोबाईलच्या जमान्यात आता ए आय टेक्नॉलॉजी आली असून मोबाईलचा वापर करताना काळजी घेतली पाहिजे तसेच अभ्यासाला व्यत्यय येत असेल तर मोबाईल पासून दूर रहा असा मौलिक सल्ला देवून क्रिकेट क्षेत्रातील दोन मित्र विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांच उदाहरण देवून सचिन तेंडुलकर ध्येयवादी राहिला आणि भारतरत्न पर्यंत मजल मारली. आंतरराष्ट्रीय स्तरावर घडामोडी विशद करून तिसरं महायुद्धाची भिती त्यांनी व्यक्त केली.
महापुरुषांनी ज्या पद्धतीने त्यांच्या जिवनाचा मार्ग क्रमण चांगला पद्धतीने केल्याने ते आज अमर झाले त्यांच्या जयंतीनिमित्त निमित्ताने आज आपण एकत्र आलो. महापुरुषांचे विचार आचरणात आणा नक्कीच भविष्यात चांगलं व्यक्तिमत्वा बरोबरच माझ्या सारखं मोठ्या उच्च पदावर कार्यरत होताल. यावेळी विद्यार्थ्यांनी येरनारे यांना विविध विषयांवर प्रश्न विचारले आणि मार्मिक उत्तर येरनारे यांनी दिले.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ॲड, संदीप वर्पे, प्रा. रविंद्र जायभाय, प्रा.जगदीश सोनवणे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल सदस्य किरण कडू यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी शेवगांव उपविभागीय पोलिस उपअधीक्षक निरज राजगुरू, नाशिक आयजी वाचक पोलीस निरीक्षक विलास पुजारी, सोनई पोलीस ठाण्याचे सपोनि अनिल मोरे स्कुल कमिटीचे अध्यक्ष सुभाष टेमक सुर्यभान फुलसौंदर, मुळा कारखान्याचे संचालक चंद्रकांत टेमक, नामदेव कंक, संजय कंक,सुहास टेमक कर्णासाहेब औटी,पानेगांवचे माजी सरपंच हौशाबापू जंगले,माजु उपसरपंच डॉ जयवंतराव गुडधे, कैलास बाचकर, राजेंद्र टेमक, भाऊसाहेब राजगुरू, नानासाहेब पुंड,आशुतोष माकोणे,ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब नवगिरे, केंद्रीय पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश गायकवाड,दिगंबर माकोणे,छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाचे प्राचार्य एस,.बी बनकर पर्यवेक्षक वाय एस पठाण आदींसह ग्रामस्थ शिक्षक वृंद उपस्थित होते प्रस्तावित ॲड विठ्ठलराव देवखिळे यांनी केले सुत्रसंचलन दुर्गा बिडवे मॅडम यांनी केले


कोणत्याही टिप्पण्या नाहीत