राहुरी फॅक्टरीतील तेजल कराड उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील तेजल कराड उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- येथील अरुण कराड यांची नात व अतुल कराड यांची कन्या तेजल अतुल कराड ही पुढील उच्च शिक्षणासाठी न्यूयॉर्क, अमेरिका येथे र...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

येथील अरुण कराड यांची नात व अतुल कराड यांची कन्या तेजल अतुल कराड ही पुढील उच्च शिक्षणासाठी न्यूयॉर्क, अमेरिका येथे रवाना होत आहे. तिच्या या शैक्षणिक वाटचालीबद्दल राहुरी फॅक्टरी परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विविध स्तरांतून तिला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.


तेजल कराड हिने राहुरी फॅक्टरी येथील डी. पॉल स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने पुढील शिक्षण पुणे येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालय येथे व नंतर मनीपाल विद्यापीठ कर्नाटक येथे शिक्षण घेतले. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत तिने आता उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठ (आय.व्ही.लीग) येथे एम.एस (क्लायमॅट) हे शिक्षण घेण्यासाठी रवाना झाली आहे.


तेजलच्या या यशामुळे कराड कुटुंबीयांसह राहुरी फॅक्टरी परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने गाठलेले हे यश परिसरातील विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.


तेजलच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच नागरिकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत