राहुरी(वेबटीम) दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आल...
राहुरी(वेबटीम)
दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक रविवार, २७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता राहुरी येथील पांडुरंग लॉन्स येथे होणार आहे.
जलसंपदा व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न होणार असून, राहुरी तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई आणि नागरिकांसमोरील विविध पाणीविषयक प्रश्नांवर यावेळी चर्चा होणार आहे.
या बैठकीस आमदार अक्षय कर्डिले तनपुरे तसेच आमदार प्राजक्त तनपुरे उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील सध्याची पाणी परिस्थिती, उपलब्ध जलसाठा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, संभाव्य टंचाईग्रस्त भाग तसेच आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित विभागांकडून माहिती घेऊन आढावा घेतला जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत