राहुरी(वेबटीम) स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचविहिरे येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या पुनर्गठनासाठी विशेष पालक सभेचे करण्यात आले. य...
राहुरी(वेबटीम)
स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचविहिरे येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या पुनर्गठनासाठी विशेष पालक सभेचे करण्यात आले. या सभेत शासनाच्या नियमांनुसार पारदर्शक कार्यवाही करत नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी संदिप यादवराव नालकर तर उपाध्यक्षपदी सोनाली भारत साळवे यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली.
शाळेच्या प्रांगणात आयोजित या पालक सभेस ग्रामस्थ व पालकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली. बैठकीच्या सुरुवातीला सभेचा मुख्य उद्देश व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे वाचन करण्यात आले. त्यानंतर सर्व पालकांच्या सहमतीने शाळा व्यवस्थापन समितीच्या नूतन सदस्यांची निवड करण्यात आली.
समितीच्या सदस्यपदी सोनाली प्रमोद तोरणे, रवींद्र बाळासाहेब नरोडे,मनीषा संजय नालकर,अर्चना सचिन साळवे, सतीश बर्डे, मेघा सचिन बर्डे, ममता शरद नरोडे, सचिन सोपान नालकर व राहुल शेलार यांची एकमुखाने निवड करण्यात आली.
यावेळी माजी सरपंच दगडू गिते,मारुती नालकर, मारुती चोथे, बाळासाहेब नरोडे, बाबासाहेब पठारे, शरद पानसंबळ, पोपट कदम, नारायण गिते, प्रताप नालकर, गणेश शेटे, राजेंद्र गिते, सतिष गिते, मुख्याध्यापक नानासाहेब सोमवते, प्रशांत जवंजाळ,शिला जाधव,स्वाती थोरात व पालक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत