राहुरी(वेबटीम) गणेशोत्सवाच्या मंगलमय आगमनानिमित्त साई आदर्श मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., राहुरी यांच्या वतीने श्री सत्यनारायण पूज...
राहुरी(वेबटीम)
गणेशोत्सवाच्या मंगलमय आगमनानिमित्त साई आदर्श मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., राहुरी यांच्या वतीने श्री सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या वतीने श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले असून, या धार्मिक कार्यक्रमास सभासद, ग्राहक, हितचिंतक तसेच नागरिकांनी उपस्थित राहून श्री गणरायाचे दर्शन, पूजेचा प्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी हा कार्यक्रम होणार असून महाप्रसादाचे आयोजन दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम साई आदर्श मल्टीस्टेट, को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., राहुरी यांच्या मुख्य कार्यालय, कामगार भवन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर येथे होणार आहे.
या मंगलमय प्रसंगी सर्वांनी सहकुटुंब उपस्थित राहून श्री गणरायाचे दर्शन घेत पूजेचा प्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत