अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी जाहीर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी जाहीर

मुंबई(वेबटीम)  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्...

मुंबई(वेबटीम)



 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.
जिल्हाप्रमुख म्हणून रामदास गोल्लार यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याकडे शेवगाव, श्रीगोंदा आणि नेवासा उत्तर-दक्षिणची जबाबदारी देण्यात आली आहे.
लोकसभा संघटक म्हणून शशिकांत गाडे (अहिल्यानगर दक्षिण) आणि दत्तात्रय कडू-पाटील (शिर्डी उत्तर) यांची नियुक्ती करण्यात आली.
उपजिल्हाप्रमुख म्हणून भगीरथ पवार (राहुरी), राधाकिसन गव्हाणे (कर्जत) आणि भास्कर शिरोळे (पारनेर) यांची नियुक्ती झाली.
तालुकाप्रमुख म्हणून विजय गव्हाणे (राहुरी), बळीराम यादव (कर्जत), भगवान दराडे (पाथर्डी) आणि श्रीकांत पठारे (पारनेर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तालुका संघटक म्हणून श्रीधर जाधव (राहुरी), दीपक गांगुर्डे (कर्जत) आणि सागर राठोड (पाथर्डी) यांना जबाबदारी देण्यात आली.
विधानसभाप्रमुख म्हणून केशव गगरे (राहुरी), सुभाष जाधव (कर्जत) आणि संतोष येवले (पारनेर-नगर) यांची नियुक्ती करण्यात आली.
तालुका समन्वयक म्हणून सचिन मोरे (राहुरी), रामकिसन भिसे (पाथर्डी) आणि मंगेश सालके (पारनेर) यांची नियुक्ती झाली.
शहरप्रमुख म्हणून प्रसाद शेटे (राहुरी), पांडुरंग जठार (कर्जत), बबन दळवी (मिरजगाव), संतोष घोरपडे (पारनेर), प्रवीण मगर (जामखेड) आणि भाऊसाहेब धस (पाथर्डी) यांची नियुक्ती करण्यात आली.
शहर संघटक म्हणून राहुल थोरात आणि शहर समन्वयक म्हणून इम्रान हबीब शेख यांची राहुरी शहरासाठी नियुक्ती करण्यात आली.
प्रसिद्धीप्रमुख म्हणून शैनेश्वर जाधव (राहुरी), दीपक मांडगे (कर्जत), नितीन यशवंत अंदुरे (पाथर्डी) आणि शुभम पाडळे (पारनेर) यांची नियुक्ती झाली.
विधानसभा संघटक म्हणून श्रीनिवास शिंदे (राहुरी), योगेश मांडगे (कर्जत) आणि कैलास डोमे (पारनेर), तर विधानसभा समन्वयक म्हणून पोपट शेळके (राहुरी), भाऊसाहेब गुंड (कर्जत), दत्तू कोरडे (पाथर्डी) आणि लहू मुळे (पारनेर) यांची नियुक्ती करण्यात आली.
उपजिल्हा संघटक म्हणून मिनीनाथ म्हस्के (कर्जत), यमाजी भिसे (पाथर्डी) आणि अतुल मुळे (पारनेर) यांची नियुक्ती झाली.
जिल्हा समन्वयक म्हणून रामदास भोसले (पारनेर), तर उपजिल्हा समन्वयक म्हणून लक्ष्मण सुहिक (कर्जत), वसंत खेडकर (पाथर्डी) आणि अविनाश मते (पारनेर) यांची नियुक्ती करण्यात आली.
डीजी समन्वयक म्हणून शरद क्षीरसागर (अहिल्यानगर जिल्हा) आणि दीपक मांडगे (कर्जत) यांची, तर महिला उपजिल्हा संघटक म्हणून सुनीता मुळे (पारनेर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत