कणगर (वार्ताहर) राहुरी तालुक्यातील कणगर येथील स्वयंभू श्री कणकावती माता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त रविवार, दि. ११ ते मंगळवार, दि. २० ऑक्ट...
कणगर (वार्ताहर)
राहुरी तालुक्यातील कणगर येथील स्वयंभू श्री कणकावती माता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त रविवार, दि. ११ ते मंगळवार, दि. २० ऑक्टोबरदरम्यान ‘एक गाव, एक नवरात्र’ उपक्रमांतर्गत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उत्सवात दररोज सायंकाळी कीर्तन, सकाळी व सायंकाळी खिचडी महाप्रसादाची पंगत, देवी महात्म्य वाचन, आरती आणि देवीला माळ अर्पण आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता कणकावती माता आराध्य भजनी मंडळाच्या देवीगीत सेवेने उत्सवाला प्रारंभ होईल. सोमवार, दि. १२ रोजी नेहाताई महाराज साळेकर-भोसले, मंगळवार, दि. १३ रोजी रोहित महाराज वरपे, बुधवार, दि. १४ रोजी सोपानदादा कनेरकर, गुरुवार, दि. १५ रोजी शिवाजी महाराज बावस्कर, शुक्रवार, दि. १६ रोजी प्रांजलीताई महाराज पानसरे, शनिवार, दि. १७ रोजी निलेश महाराज रोडे, रविवार, दि. १८ रोजी अनिल महाराज बर्डे आणि सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी गजानन महाराज पाटील यांची कीर्तन सेवा होणार आहे.
मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी तुकाराम महाराज केसभट यांच्या काल्याच्या कीर्तनाने आणि महाप्रसादाने नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे.
उत्सवाच्या निमित्ताने संतपूजन, खिचडी प्रसाद आणि अन्नदानासाठी समाजातील दानशूर व्यक्तींचे सहकार्य लाभणार आहे. या धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्वयंभू श्री कणकावती माता नवरात्र उत्सव मंडळ, भाविक भक्त आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत