देवळाली प्रवरा येथे शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा जागर सोहळा उत्साहात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा येथे शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा जागर सोहळा उत्साहात

देवळाली प्रवरा(वेबटीम) सेंट मेरी युवक मंडळ व महिला मंडळ, देवळाली प्रवरा आणि आशांकुर ग्रामीण विकास महिला केंद्र, भोकर यांच्या संयुक्त विद्यमा...

देवळाली प्रवरा(वेबटीम)



सेंट मेरी युवक मंडळ व महिला मंडळ, देवळाली प्रवरा आणि आशांकुर ग्रामीण विकास महिला केंद्र, भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने राजवाडा परिसरात शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या थोर विचारांचा जागर सोहळा उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात शाहीर श्री. भारत मुंजे व संच, परभणी येथील लोककलावंत श्री. सुनील नलवडे, श्री. शिवराज मुंजे, श्री. गणेश कांबळे आणि श्री. राजू सर यांनी आपल्या प्रभावी वाणीतून सामाजिक प्रबोधन केले. संगीतमय वातावरणात सादर झालेल्या या कार्यक्रमातून शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, महिला सक्षमीकरण, आरोग्य आणि पर्यावरण या विषयांवर जनजागृती करण्यात आली.

या जागर सोहळ्याला राजवाडा परिसरासह देवळाली प्रवरा पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रमाई बचत गट, नूतन बचत गट, ज्ञानग्रंथ बचत गट आणि अभिमान बचत गटाच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

याप्रसंगी आशांकुर ग्रामीण विकास महिला केंद्र, भोकर यांच्या संचालिका सिस्टर प्रिसका, सिस्टर अगनेस, सौ. अश्विनी पवार, श्री. अतुल अबुज तसेच डॉ. प्रवीण कोठुळे उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजसेविका रेखाताई थोरात, ज्योती थोरात, सविता पंडित, अर्चना पंडित, पूजा गायकवाड, राईसा शेख यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी डॉ. प्रवीण कोठुळे, ॲड. विशाल संसारे आणि संदीप पंडित यांच्या हस्ते कलाकारांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा थोरात यांनी केले, तर संदीप पंडित यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत